शृंगाराच्या दलदलीतून बाहेर पडून नैतिक मानवी मूल्यांचा उत्कट भाव प्रगट करणारे मराठी जैन साहित्य म्हणजे भारतीय चेतनेचे स्तोत्रच आहे, असे मला वाटते
आज काम आणि अर्थ या दोन प्रेरणांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सवंग, करमणूक वाढली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान माणुसकीची साथ सोडून मस्तवाल जनावराप्रमाणे उंडारत आहेत. वास्तविक आपल्याकडे निकोप सांस्कृतिकतेच्या अनेक परंपरा आहेत. तत्वज्ञान, शास्त्रीय संगीत, नाटके, दुर्मीळ ग्रंथ, ऐतिहासिक परंपरा, चित्रकला हे आपले अलंकार आहेत. हे शालू-शेले आपण जपले पाहिजेत.......